जागतिक परिचारिका दिनी जयंत पाटील यांचे भावनिक पत्र ; म्हणाले, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार 

जागतिक परिचारिका दिनी जयंत पाटील यांचे भावनिक पत्र ; म्हणाले, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार 


जागतिक परिचारिका दिनी जयंत पाटील यांचे भावनिक पत्र ; म्हणाले, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आज जागतिक परिचारिका दिन... गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून डॉक्टरांसह परिचारिकाही अहोरात्र कोरोनाशी झुंज देत आहे. या संपूर्ण यंत्रणेचं मनोबल वाढवं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या संकटकाळात लढणाऱ्या परिचारिकांना भावनिक पत्र लिहिले आहे. तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार अशी आपुलकीची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणतात,
परिचारिका म्हणून काम करणार्यात माझ्या सर्व माता भगिनींना, सविनय नमस्कार! सर्वप्रथम तुम्हाला जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा! जगात प्रत्येक व्यक्ती आर्थिक प्राप्तीसाठी काही ना काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील. परिचारिका म्हणून नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे. आज सारे जग Covid 19 सारख्या अत्यंत गंभीर युद्धात लढत असताना, या युद्धात सैनिक मात्र तुम्ही सार्याह परिचारिका आहात. या लढाईचे नेतृत्व देखील तुमच्याकडेच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत आहात, याची आम्हा सगळ्यांना पूर्ण जाणीव आहे. तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग Covid19 च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल. या सार्याआ काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरूर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणुन मी तुमच्या सोबत आहे.
तुमचा भाऊ,
(जयंत पाटील)


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments