खानापूरच्या तहसीलदारांना “या” पैलवाना कडून मारहाण 


खानापूरच्या तहसीलदारांना “या” पैलवाना कडून मारहाण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : खानापूर जि. सांगली येथील तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना तहसील कार्यालयाच्या आवारातच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तहसीलदार ऋषिकेत शेळके हे तहसील कार्यालयामधुन काम करून ते बाहेर पडत असताना त्याठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हा आपल्या सहकार्यासोबत त्या ठिकाणी आला व वाळूचा दंड इतका का केला म्हणून वाद घालू लागला. तसेच केलेला दंड कमी करण्याची करण्याची मागणी करू लागला. यावेळी तहसीलदार यांनी मी केलेला दंड मला कमी करण्याचा अधिकारी नाही तुम्ही अपील करा असे सांगताच पैलवान चंद्रहार पाटील व त्याच्या सहकाऱ्याने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना गाडीत बसत असताना मारहाण केली. मारहाणी नंतर पैलवान चंद्रहार पाटील व त्याचे सहकारी मागील बाजूने पळून गेले. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.  


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

Previous Post Next Post