“तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही” ; या माजी खासदाराची महाविकास आघाडीवर केलेली टीका त्यांच्याच अंगलट ; टीकेपेक्षा स्वत: झाले मोठ्या प्रमाणावर ट्रोल

“तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही” ; या माजी खासदाराची महाविकास आघाडीवर केलेली टीका त्यांच्याच अंगलट ; टीकेपेक्षा स्वत: झाले मोठ्या प्रमाणावर ट्रोल


“तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही” ; या माजी खासदाराची महाविकास आघाडीवर केलेली टीका त्यांच्याच अंगलट ; टीकेपेक्षा स्वत: झाले मोठ्या प्रमाणावर ट्रोल
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : रिक्षामध्ये बसलेल्या तीन माकडांचा फोटो शेअर करीत माजी खासदार निलेश राणे यांनी  सध्याच्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारवर “तिघे जण बसलेत व चालवायला तिघांनाही येत नाही: अशी खोचक टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या दोन्ही सुपुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे हे महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या त्या- कोणत्या माध्यामातून कायम टीका करत असून टीका करण्याची एक ही संधी ते सोडत नाहीत.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्यात आणि सेनेमध्ये कायम कलगीतुरा पहावयास मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणून उपमाच दिली होती. शिवसेनेने एकाच वेळी नारायण राणे व त्यांचे खासदार असणारे पुत्र निलेश राणे यांना पराभवाचा झटका दिला होता. काँग्रेसला रामराम करीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व खासदारकी मिळवली. परंतु लगेचच त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. परंतु ज्या गतीने पक्षाची स्थापना झाली त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने त्याचे भाजपमध्ये विलीन करण्यात आला होता. निलेश राणे यांनी केलेल्या या टीकेला सोशल मिडीयावर त्यांनाच मोठा प्रमाणात नेटकऱ्यांनी ट्रोल केले असून यामध्ये “तिघे ही इतके पणवती आहेत की ज्या पक्षात जातात त्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून बसावे लागते”, “त्या माकडा सोबत एकेकाळी एक बेडूक सत्तेत होत.. 1. एकदा मुख्यमंत्री झालं.. 2. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी बेडूक उडी मारून दुसऱ्या माकड सोबत गेलं” . हो बघाना राणे...आणि तुम्ही यांचेच वंशज आहात. (कटु आहे पण सत्य आहे), फॅमिली पुतूग्राफ हाय काय ह्यो?, फॅमिली पुतूग्राफ हाय काय ह्यो?, तीन राणे एका लाईनीत, सर ते चालवणारे नारायण राणे ना?, घरच्यांचे फोटो असे नसते टाकायचे रे, बरोबर घरचा फोटो कशाला टाकायचा, एकाच घरातील तीन माकडे मुख्यमंत्री पदासाठी बेडूक उड्या मारुन मारुन थकले, काहीवेळेस रडले पण, शेवटी खासदारकीचं आईस्क्रीम देऊन थंड केलं, ब्रेक वरती पाय पोहचतेत का म्हणून कोणी तरी कॉमेंट केली होती,डिलिट केली वाटतय त्याने, ब्रेक पर्यंत पाय पोहोचत नाही या वरुन अंदाज येतो की हे तुघे कुठले असतील ते., सर पहिले माकड म्हणतो मी वुहानला नेणार, फेसबुक लाईव्ह करायचे आहे दुसरे माकड म्हणते मी न्युयार्कला नेणार कँसर ट्रिटमेंट आहे तिसरे माकड म्हणतयं मी इटलीला नेणार जुना बार आहे शेवटी माकडच "माकडाच्या हातात कोलीत" ज्यांनी दिले ते भोगणारच. 
त्यामुळे निलेश राणे यांची अवस्था करायला गेले एक अन झाले एक या म्हणीप्रमाणे झाली आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments