विभूतवाडीच्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त चार्ज या पोलीस पाटलांकडे

विभूतवाडीच्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त चार्ज या पोलीस पाटलांकडे


विभूतवाडीच्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त चार्ज या पोलीस पाटलांकडे
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील पोलीस पाटील पद रिक्त असल्याने तेथील असणारा पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त चार्ज गुळेवाडीच्या पोलीस पाटील शुभांगी संजय थोरात यांच्याकडे आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी आदेश काढून सोपविला आहे.
सध्या देशात व राज्यात कोरोनाचे संकट आ वासून उभे असून या संकटावर मात करण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटील हे पद अतिशय महत्त्वाचे झाले आहे. गावामध्ये असलेल्या लोकांची काळजी घेणे व गावामध्ये बाहेरून आलेल्या लोकावर लक्ष ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे काम पोलीस पाटलांवर असल्याने विभूतवाडी येथे रिक्त असलेल्या पदावर गुळेवाडीच्या पोलीस पाटील शुभांगी संजय थोरात यांच्याकडे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत देणेत आला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


 


Post a comment

0 Comments