२१ मे रोजी राज्यातील विधानपरिषद निवडणुका ; निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर 


२१ मे रोजी राज्यातील विधानपरिषद निवडणुका ; निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून २१ मे रोजी राज्यातील विधानपरिषद निवडणुका होणार आहेत.
 24 एप्रिलला राज्यातील विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 
निवृत्त होणारे सदस्य 
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून गेलेले सदस्य चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड
काँग्रेस - चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड 
राष्ट्रवादी - हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर
भाजप - पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ, अरुण अडसड
शिवसेना - डॉ. नीलम गोऱ्हे


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured