भाजप ने गोपीचंद पडळकर याना विधान परिषद वर संधी द्यावी :सौ.विद्याताई तामखडे 


भाजप ने गोपीचंद पडळकर याना विधान परिषद वर संधी द्यावी :सौ.विद्याताई तामखडे 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे राघव मेटकरी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असून राज्याला लढवय्या नेत्यांची गरज असून ती गरज खडतर संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व गोपीचंद पडळकर पूर्ण करू शकतात. त्यासाठी बहुजन जनतेचा मास बेस असलेल्या गोपीचंद पडळकर याना संधी देण्याची मागणी गोपीचंद पडळकर सोशल मीडिया राज्य अध्यक्ष विद्याताई तामखडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत पाटील यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. 
राज्याच्या राजकारणात अनेकांना संधी मिळून सुद्धा त्याना छाप पाडता आली नसून त्यामुळे उभरते नेतृत्व पुढे आणण्याची गरज आहे. राज्यात आज अखेर गोपीचंद पडळकर सोशल मीडिया चे राज्यभर जाळे असून त्यांना मानणारा वर्ग राज्याच्या प्रत्येक गावात सर्वदूर सापडतो. त्यामुळे मास लीडर असलेल्या आणि शून्यातून वर आलेल्या या हिऱ्यास कोंदणात बसवण्याच काम भाजप ने करावे अशी मागणी त्यांनी माणदेश एक्सप्रेस शी बोलताना केली. यावेळी त्यांच्या सोबत सांगली जिल्हा संपर्क प्रमुख अनिल सूर्यवंशी तर मीडियाची प्रमुख जबाबदारी असलेले आबासाहेब भानवसे होते.गोपीचंद पडळकर याना विधानपरिषद वर संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील आणि त्यासाठी यावेळी ही संधी आम्हाला हवी आहे. राज्याच्या नेतृत्वाने संधी दिल्यास विरोधकांना सळो की पळो करून पडळकर राज्याचा राजपटल हलवून सोडतील यात शंका नाही.


सौ. विद्याताई तामखडे 
अध्यक्ष, गोपीचंद पडळकर सोशल मीडिया राज्य मंच, महाराष्ट्र


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad