आटपाडी येथील शिक्षक  धम्मदीप बनसोडे यांचे "विशेषत्वा चा शोध" हे पुस्तक अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध


आटपाडी येथील शिक्षक  धम्मदीप बनसोडे यांचे "विशेषत्वा चा शोध" हे पुस्तक अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी :   सध्या कोरोना मुळे सर्व जगभर तणावाचे वातावरण आहे. संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन असल्याने सर्वच जण आपापल्या घरी असून नवीन छंद जोपासत आहेत. सध्याच्या धावत्या युगात लोकांना स्वतःचे छंद जोपासायला इतके दिवस वेळ मिळत नसे. तो या लॉकडाऊन मधून उपलब्ध झाला. आणि बर्या च जणांच्या सुप्त कला यातून बाहेर पडल्या. अशाच फावल्या वेळाचा सदुपयोग म्हणून आटपाडीतील प्राथमिक शिक्षक श्री धम्मदीप बनसोडे यांनी स्वतःची दोन ebook  (इ-पुस्तकं) Amazon Kindle या प्रकाशनाद्वारे प्रकाशित केली आहेत. त्या तील पहिले पुस्तक आहे "गोष्टी बोलक्या प्राण्यांच्या" हे मुलांसाठी चा बालकथा संग्रह आहे. तर दुसरे पुस्तक "विशेषत्वा चा शोध" मोटिवेशनल स्वरूपातले असून विद्यार्थी, तरुण, तसेच मानसिक तान तणावाखाली असलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे. जीवनात यश प्राप्तीसाठी आवश्यक असणारे पोषक विचार/तत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
"जीवना त घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे जर सकारात्मक दृष्टीने पाहिला लागलो तर आपले जीवन आनंदाने आणि उत्साहाने भरून जाईल." येणाऱ्या संकटांना आणि अडचणींना जर आपण एक नवीन संधी म्हणून पाहिले तर निश्चितच आपण या जगात एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख निर्माण करु शकतो." आशा प्रकारच्या अनेक प्रेरणादायी विचारांचा आपल्या जीवनात यश प्राप्तीसाठी कशा प्रकारे उपयोग करता येतो हे उदाहरणासह सांगण्यात आले आहे. सध्या हे पुस्तक Amazon.com उपलब्ध आहे. 
ज्यांना हे पुस्तक खरेदी करायचे आहे त्यांनी या लिंकद्वारे ते खरेदी करू शकता.  https://amzn.to/2YrKanx


 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad