मानेवाडी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचा कोरोना संकटाशी दोन हात ; सरपंच व ग्रामस्तरीय समितीची कामगिरी उल्लेखनीय

मानेवाडी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचा कोरोना संकटाशी दोन हात ; सरपंच व ग्रामस्तरीय समितीची कामगिरी उल्लेखनीय


मानेवाडी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचा कोरोना संकटाशी दोन हात ; सरपंच व ग्रामस्तरीय समितीची कामगिरी उल्लेखनीय
माणदेश एक्सप्रेस न्युज
मनोज कांबळे/खरसुंडी : सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध ग्रामपंचायत पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मानेवाडी (ता.आटपाडी) येथील ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी कोरोना संकटाची दोन हात केले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांमध्ये या विषाणू संबंधी जनजागृती केली जाते. तसेच ग्रामस्थांकडूनही सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना वेळोवेळी शासनाच्या नियमांची माहिती दिली जाते. गावातील सर्व ग्रामस्थ मास्कचा वापर करताना दिसून येत आहेत. ग्रामस्तरीय आपत्कालीन समितीमार्फत बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्यांना प्रथम गावातील शाळेत क्वारंटाईन जात आहे. मानेवाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच अमोल खरात यांनी स्वतः ब्लोअरने फवारणी करून संपूर्ण गाव  निर्जंतुकीकरण केले. गावातील स्वस्त धान्य रेशन दुकानातून सरपंचाच्या उपस्थित शासनाकडून येणारे रेशन वाटप करण्यात येते. 
विधवा, अपंग, गरजू लोकांना चितळे उद्योग समूह यांच्याकडून किटचे वाटप करण्यात आले. काही दानशूर व्यक्तीने पुढाकाराने भटकंती करणाऱ्या नंदीवाले समाज तसेच बिहारसह परराज्यातून कॅनॉलच्या कामासाठी आलेल्या कामगारांना किराणामाल दिला आहे. अत्यंत गरीब असलेल्या कोळसेवाल्या कुटुंबास कपडे, दूध, फळे, औषधे, किराणामाल दिला आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांनी गावात भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या कामगिरीचे कौतुक केले. तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती सरपंच अमोल खरात यांनी माणदेश एक्सप्रेसशी बोलताना दिली.ग्रामस्तरीय आपत्कालीन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक रामचंद्र मोटे, पोलीस पाटील गजानन मेटकरी तसेच गावातील काही दानशूर, प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थांसाठी परिश्रम घेत आहेत.
जिल्हा व राज्याबाहेरून येणाऱ्या ग्रामस्थ तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी ग्रामपंचायतीस पुढील काळातही असेच सहकार्य करावे.
अमोल खरात
सरपंच,मानेवाडी


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments