आटपाडी पोलिसांनी पकडला तब्बल १४ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा ; जिल्हा हद्दीच्या उंबरगाव चेकपोस्ट नाक्यावर कारवाई 


आटपाडी पोलिसांनी पकडला तब्बल १४ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा ; जिल्हा हद्दीच्या उंबरगाव चेकपोस्ट नाक्यावर कारवाई 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील उंबरगाव चेकपोस्ट नाक्यावर कारवाई करीत कर्नाटकातून कराडकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो मधून तब्बल १४ लाख ५२ हजार रुपयांचा बंदी असलेला गुटखा पकडला.
याबाबत अधिका माहिती अशी, सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवर उंबरगाव येथे आटपाडी पोलिसांचे चेकपोस्ट  आहे. दि. ७ रोजी रात्री २ वाजता आयशर टेम्पो क्र. एम.एच.४६ बी.एफ. ४२३५ हा उंबरगाव चेकपोस्टवर आल्यावर तेथील पोलीस कर्मचारी पोना अशोक घोरपडे, विशाल चव्हाण, देशमुख यांनी सदर टेम्पो थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा, मेडिकल असा स्टिकर लावलेला होता. परंतु आरटीओचा  परवाना नव्हता, अधिकृत पत्र काचेवर चिकटवले नव्हते त्यामुळे तपासणी केली असता टेम्पोच्या हौदात मागील बाजूस भुशाची पोती व त्यापुढील बाजूस गुटख्याची पोती असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक रूपचंद प्रेमचंद पांडे (वय 40, रा. महु, मध्य प्रदेश) याला व 10 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो व 14 लाख,52 हजार, 288 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला. महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारा गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मेघना समाधान पवार यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबले यांच्या सूचनेनुसार विटा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे व आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक खाडे, कराळे, पोलीस शिपाई देशमुखे, मोरे, अतुल माने या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Twitter ला फॉलो करा माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad