पंकजा मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास केला; जो मला आणि इतरांना जमला नाही : या माजी मंत्र्याचा भाजपला घरचा आहेर 

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : विधान परिषद उमेदवारीवरून सध्या भाजपमध्ये अजून ही नाराजी वाढत असून जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर माजी मंत्री राहिलेल्या या नेत्याने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 
विधान परिषदेच्या ४ जागांसाठी भाजपाकडून देण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षावर अनेक आरोप केले आहेत. ज्यांनी पक्षवाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. ज्यावेळी पक्षाला राज्यात कोणी विचारत नव्हतं तेव्हापासून पक्ष उभा केला त्यांना डावलून अलीकडेच पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.खडसे पाठोपाठ आता भाजपचे माजी मंत्री राहिलेल्या प्रा. राम शिंदे यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला असून चंद्रकांतदादा पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला अआहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दोन दिवसात चांगला अभ्यास केल्यानेच रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. जो अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही असे ते म्हणाले. त्यामुळे शिस्तबद्ध असलेल्या भाजपमध्ये देखील नाराजीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. 

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments