Type Here to Get Search Results !

मी गोपीचंद पडळकर आमदार म्हणून शपथ घेतो की....


मी गोपीचंद पडळकर आमदार म्हणून शपथ घेतो की....
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यातील होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर केली असून त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा समावेश झाला असून आटपाडी तालुक्यासह खानापूर मतदार संघाला आता दोन आमदार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
रासपच्या माध्यमातून राजकीय जीवनाची सुरुवात गोपीचंद पडळकर यांनी केली. तालुक्यामध्ये असणाऱ्या विरोधकाची भूमिका प्रखरपणे बजावत त्यांनी अल्पावधीतच तालुक्यामध्ये युवा कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली. विधानसभेला त्यांनी रासपकडून उमेदवारी दाखल करीत आजी माजी आमदारांना दखल घ्यायला लावली. रासपशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये नगण्य असणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश केला. तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे व चंद्रकात पाटील यांच्या मार्फत त्यांनी तालुक्यामध्ये भाजपचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. सांगली महानगरपालिकेमध्ये त्यांनी स्टार प्रचारकाची भूमिका बजावत जेथे काँग्रेस व राष्ट्रवादी सोडून निवडून येणे मुश्किल होते त्या ठिकाणी त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. लोकसभेला खास. संजयकाका पाटील यांचा संपूर्ण मतदार संघामध्ये झंजावात प्रचार करीत त्यांना निवडणून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता हे नाकारून चालणार नाही. कारण याची दखल खुद्द गोपीनाथ मुंडे यांनी सांगली येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये घेतली होती. लगलेच विधानसभेला त्यांना खानापूर मतदार संघात तिकीट मिळाले ते निवडून येणार याची सगळ्या मतदार संघामध्ये खात्री होती. परंतु ज्यांना-ज्यांना मदत केली त्या अनेकांनी दगाफटका केल्यानं त्यांना पराभव स्विकारावा लागला. याची सल मनात कायम राहिली. खास. संजयकाका पाटील यांच्याशी झालेल्या मतभेदातुन त्यांनी भाजपला जय मल्हार केला व लोकसभेला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभेला शड्डू ठोकला. परंतु त्यामध्ये अपयश आल्याने ते काहीकाळ अलिप्त राहिले. विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश करीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बारामती विधानसभा मतदार संघातुन उभे करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समोर तगडे आवाहन निर्माण केले होते. 
त्यामुळे त्यांची केंद्रीय नेतृत्वाला दखल घ्यायला भाग पडल्याने राज्यामध्ये होणाऱ्या विधानपरिषदसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून गोपीचंद पडळकर हे आता आमदार गोपीचंद पडळकर होणार असल्याने मतदार संघामध्ये आनंदाचे वातारणात तयार झाले आहे.


 


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा


माणदेश एक्सप्रेस whatasapp


 


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा माणदेश एक्सप्रेस माणदेश एक्सप्रेस Telegram


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies