Type Here to Get Search Results !

सचिन वावरे मित्र मंडळाकडुन मुख्यमंत्री सहाय्य निधीस मदत व जीवनावश्यक वस्तुचे वाटप


सचिन वावरे मित्र मंडळाकडुन जीवनावश्यक वस्तुची मदत
माणदेश एक्स्प्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : येथील सचिन वावरे मित्र परिवाराच्या वतीने कोव्हीड-19 मुख्यमंत्री सहाय्य निधीस अकरा हजारांची मदत व  जीवनावश्यक वस्तु असणारे १०० कीट नायब  तहसिलदार तुषार देशमुख यांच्याकडे सुपुर्त केले. यावेळी येथील उद्योजक सचिन वावरे, अॅड निलेश कदम उपस्थित होते.
सध्या देशात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले घातल्याने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक व्यवसाय बंद असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. समाजातील गरीब व गरजू नागरीकांना अनेक जण मदतीचा हात देत आहेत. या मदतीमुळे अशा गरजुंना थोडाफार दिलासा मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन माळशिरस येथील उद्योजक सचिन वावरे यांनी त्यांच्या मित्र परीवाराच्या वतीने या रोगावर मात करण्यासाठी कोव्हीड-19 मुख्यमंत्री सहाय्य निधीस अकरा हजारांची मदत व गरजु लोकासाठी जीवनावश्याक वस्तुचे शंभर कीट देण्यात आले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies