धनंजय मुंडेंचे आभार ;  दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, निराधार  यांचा लाभार्थींना तीन महिन्याचे आगाऊ मानधन खात्यात जमा : डॉ.संतोष मुंडे


धनंजय मुंडेंचे आभार ;  दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, निराधार  यांचा लाभार्थींना तीन महिन्याचे आगाऊ मानधन खात्यात जमा : डॉ.संतोष मुंडे
माणदेश एक्सप्रेस न्युज
परळी वैजनाथ/प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी कोरोनाचे संकटात सापडलेल्या दिव्यांग बांधवांना तीन महिन्याचे एकत्रित एँडव्हन्स लाभार्थी अनुदान तात्काळ वाटप केल्यामुळे धनंजय मुंडे यांचे सर्व दिव्यांग बांधवांनी आभार मानले आहेत. दिव्यांग बांधवांच्या खात्यात तीन महिन्याचे आर्थिक मानधन जमा झाल्यामुळे कोरोनाच्या संकटात आधार मिळाला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांनी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर निधी करून दिला व दिलेला शब्द पाळला त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानले आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र थैमान घातले आहे. याच संकट काळात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिव्यांग बांधवांना तीन महिन्याचे मासिक अनुदान तात्काळ वाटप केल्यामुळे संकटात आधार दिला आहे.  यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील एप्रिल ते मे 2020 चे 2000 रूपये, संजय गांधी निराधार अनुसूचित जाती 3000, संजय गांधी निराधार अनुसूचित जमाती 3000, इंदिरा गांधी व राजीव गांधी विकलांग (80 ते 100 टक्के) 2800, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा डीआरडी 4000,. माहे एप्रिल, मे, जून, सामुग्रही अनुदान जमा, श्रावणबाळ योजना एप्रिल, मे, जून महिन्याचे प्रत्येकी  3000, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजनेतील एप्रिल मे, जून प्रत्येकी 4000.हजार रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत. परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील 4331 तर श्रावणबाळ योजनेतील 11253 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे संकट काळी धनंजय मुंडे धावून आले असल्यामुळे दिव्यांग बांधवांना आधार मिळाला आहे. तसेच दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किटचे ही वाटप करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग बांधवांनी अनुदान बँक खात्यातून पैसे काढतांना सोशल डिस्टन्सींग व गर्दी न करता पैसे काढावे असे आवाहन डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहेत. तसेच पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार डॉ. विपीन पाटील, नायब तहसीलदार बी.एल. रूपनर, लिपिक गोवर्धन गर्जे यांचे आभार मानले आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ  लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित ऍडव्हान्स जमा केले आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांचे  साजन लोहिया, शेख फेरोज, अनंतराव लोखडे, दशरथ सुत्रावे, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संतोष आघाव,  संजय नखाते, संदेश कापसे, नागरगोजे आशा, सरताज खान,  शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे,  रंजित रायभोळे, सय्यद सुभान, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख सिंकदर, मनोज नाथानी, राम वलवार, विमल धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, ममता बद्दर, महादेव राऊत, बालाजी शहाणे, प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग,  महेबुब पठाण, योगीराज दुर्गे, विशाल चव्हाण, सुरेश माने,शिवाजी माने, शेख हबीबभाई, शेख मुबारक, विजय भोयटे, गोपाल बाराड, पठाण आसेफखान व अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, आणि माजी सैनिक संघटनेने आभार मानले आहेत. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad