खंडाळीतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहु : विकास (दादा) धाईंजे ; मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी माझी : वैभव गिते 


खंडाळीतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहु : विकास (दादा) धाईंजे ; मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी माझी : वैभव गिते 
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वैभव काटे : मौजे खंडाळी ता. माळशिरस, जि. सोलापुर येथे दिनांक १ मे २०२० रोजी मातंग समाजातील रामचंद्र विठ्ठल खंडागळे या तरुणाचा खुन झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खंडाळी येथे भेट दिली व खंडागळे कुटुंबाचे सांत्वन केले. 
मयत रामचंद्र खंडागळे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील पत्नी व दोन लहान मुले तसेच एक मतिमंद भाऊ आहे. ही परिस्थिती लक्षात घेता वैभव गिते यांनी दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसह कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याची घोषणा घटनास्थळीच केली व तात्काळ समाजकल्याण व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून पीडित कुटुंबास तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या. या घटनेत तीनही आरोपींना अटक केली, असून आरोपी सध्या पोलीस कास्टडीमध्ये आहेत.
विकासदादा धाइंजे यांनी सदर कुटुंबाच्या केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले व तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीची मदत, पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी एन.डी.एम.जे चे नेते बाबासाहेब सोनवणे, भगवान भोसले, दत्ता कांबळे, समीर नवगिरे, वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र साळवे, कल्याण लांडगे, खंडाळीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव साबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे, आबा वाघमारे, योगेश खंडागळे, सौरभ वाघमारे, अभय वाघमारे, प्रवीण खरात, प्रकाश खरात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad