Type Here to Get Search Results !

विष्णुपंत वाघमोडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ; गरजूंना दिला मदतीचा हात 


विष्णुपंत वाघमोडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ; गरजूंना दिला मदतीचा हात 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या देशात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान  घातल्याने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक व्यवसाय बंद असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. समाजातील गरीब व गरजू नागरीकांना अनेक जण मदतीचा हात देत आहेत, या मदतीमुळे अशा गरजुंना थोडाफार दिलासा मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भांबुर्डी (अहिल्यानगर) ता.माळशिरस  याठिकाणी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य  विष्णुपंत वाघमोडे मित्र परिवार यांच्या वतीने गरीब व गरजू  लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माळशिरसचे नायब तहसीलदार तुषार देशमुख , महसुल तहसीलदार  नामदेव काळे, मंडळ अधिकारी लकडे , गावचे जेष्ठ नेते अध्यक्ष तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपतराव वाघमोडे, माजी सरपंच केशव वाघमोडे, तलाठी  चव्हाण, ग्रा.प.सदस्य  विष्णुपंत वाघमोडे, सचिन वाघमोडे ,  रासपचे सरचिटणीस दत्तात्रय कोकरे पोलीस पाटील रावसाहेब वाघमोडे, अॅड.ज्ञानदेव वाघमोडे, दिपक वाघमोडे, बापु वाघमोडे, सुखदेव नरळे, धनाजी वाघमोडे, भारत वाघमोडे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा करवले, बाळु चव्हाण इत्यादी उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies