गावासाठी यांची थेट दिल्लीतुन मदत

गावासाठी यांची थेट दिल्लीतुन मदत


गावासाठी यांची थेट दिल्लीतुन मदत
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता.आटपाडी, जि. सांगली या गावात कोरोनाच्या लढ्यात शिस्तबद्ध पावलं उचलली गेली असून त्याबद्दल नुकतंच आटपाडी च्या गटविकास गटविकास अधिकारी यांनी  दक्षता पथक,  आरोग्य पथक आणि सामाजिक संस्था न्यू माणदेश युथ फाउंडेशन चे कौतुक केले आहे.
निंबवडे येथे गरजू व्यक्तींच्या मदतीला दानतीचा पॅटर्न राबवला गेला असून अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली केल्याने यातून गरजू लोकांना किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले आहे. यातच गावातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी डॉ. बाळू नाथा मोटे यांनी दिल्लीतुन मदत केली आहे. डॉ. बाळू नाथा मोटे हे सध्या केंद्र सरकार च्या कोविड 19 कोरोना च्या आयुष्यमान योजनेत राजधानी दिल्ली येथे कोरोना च्या विरोधात विशेष मोहिमेत कार्यरत आहेत.
निंबवडे गावात न्यू माणदेश युथ फाउंडेशन विविध आघाड्या वर मदत करण्याचा प्रयत्न करत असून डॉ. बाळू मोटे यांची या कार्यात मागील चार वर्षांपासून सहभाग राहिला आहे. कोरोना च्या या जगण्या मरण्याच्या लढाईत सर्वांना मदतीचे आवाहन न्यू माणदेश युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोटे यांनी केल्यानंतर त्यांना डॉ. बाळू मोटे यांनी थेट दिल्ली येथून संपर्क करून मदत केली. यावेळी माणदेश एक्सप्रेस शी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब झुरे यांनी सांगितले की, लॉकडाऊन च्या दुसऱ्या टप्प्यात 3 मे पर्यंत संस्थेमार्फत किराणा मालाचे किट वाटप करण्याचे नियोजन व्यवस्थित पार पाडण्यात आले. त्या दरम्यान गावात स्वस्त धान्य दुकानातून बहुतांश नागरिकांना रेशन मिळाले असल्याने आता संस्थेमार्फत दक्षता समिती आरोग्य विभागाला मदत करण्याचा मानस असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त गावातील विविध संस्था, मंडळ, समाजसेवक यांनी पुढाकार घेऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. माझं बालपण आणि शिक्षण माणदेशी मातीत झालं असून आज मी दिल्ली मधून कोरोना च्या विरोधातील लढाईत माझी जबाबदारी पार पाडत आहे. गावच्या मातीसाठी नुकतेच आमचे बंधू फायरब्रिगेड मुंबई येथे कार्यरत आप्पा मोटे यांनी मदत केल्यानंतर आज मी सुद्धा मदत करत आहे. न्यू माणदेश युथ फाउंडेशन ही संस्था तरुणांनी गावच्या सामाजिक कार्यासाठी सुरू केलेला अध्याय असून मी चार वर्षांपासून आरोग्य शिबीर व इतर बाबीत सहभागी आहे. यापुढे ही मदतीचा संस्कार कायम ठेवणार आहे
डॉ. बाळू नाथा मोटे
नियोजन विभाग कोरोना, आयुष्यमान कक्ष, दिल्ली


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा


माणदेश एक्सप्रेस whatasapp


 


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा


माणदेश एक्सप्रेस Telegram


Post a comment

0 Comments