दिघंची ग्रामपंचायतकडून दिव्यांगांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप


दिघंची ग्रामपंचायतकडून दिव्यांगांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : दिघंची ता.आटपाडी, जि. सांगली येथील ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामनिधी मधून दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य असलेले किट माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी असून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने त्याचा फटका अंध व अपंग बांधव यांना सुद्धा बसला असून जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाल्याने दिघंची ग्रामपंचायतीने ५ टक्के ग्रामनिधी मधून त्यांना जीवनावश्यक साहित्य असलेले कीट वाटप केले. यावेळी सरपंच अमोल मोरे, युवा नेते विकास मोरे, मेजर नानासो जावीर, मुन्नाभाई तांबोळी, संजय वाघमारे, बळीराम रणदिवे, अजित रणदिवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

Previous Post Next Post