कोरोनामुळे चिमुकल्यांना मामाचा गाव झाला पोरका ; कोरोनामुळे आजोळी नो एंट्री, बालपणीचे खेळ ही बंद


कोरोनामुळे चिमुकल्यांना मामाचा गाव झाला पोरका ; कोरोनामुळे आजोळी नो एंट्री, बालपणीचे खेळ ही बंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
महुद/वैभव काटे : दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या की, प्राथमिक व माध्यमिक च्या मुलांची परीक्षा व्हायची. त्यानंतर चिमुकले उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस मोजत बसायचे. आणि एकदा सुट्टी लागली की, मुलांना मामाच्या गावी जायचे वेध लागायचे. मामाच्या गावाकडे काय काय मजा करायची,याचे चित्र त्यांच्या मनात तयार असायचे. परंतु ह्या वर्षी कोरोणामुळे गावाकडे नो एन्ट्री असल्याने जुने आठवणीतील खेळ बंद झाले असून, चिमुकल्यांना मामाचे गावही पोरके झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आपल्या मनातील सर्व भावना या मामा-मामी च्या घरी जाऊन पूर्ण होत होत्या. परंतु या कोरोना संसर्गजन्य विषाणूमुळे सगळा देश ढवळून निघाल्याने चिमुकल्यांच्या मनाने धास्ती घेतलेली दिसून येत आहे. तसेच मामाच्या गावाकडील मनातच तयार केलेल्या जवळपास या सर्वच गोष्टी हरवले असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. सुट्टीच्या अगदी पहिल्या दिवशी मामाचा गाव गाठायचा व मनसोक्त बागडन, रानोमाळ भटकत फिरणे. कैऱ्या, बोर, चिंच, खाणे. भातुकलीच्या खेळात रमणे. दिवसभर उन्हात उन्हाड पाखरासारखे फिरणे. बैलगाडीत बसून शिवारात फेरफटका मारणे. आणि दिवेलागण व्हायच्या आत घराकडे वळणं हे मंतरलेले दिवस, असे दिवस आता मुलांच्या वाटेला येत नाहीत. दिवसभर खेळून बागडून घरी आल्यावर हात-पाय धुऊन सर्व परिवारासोबत शुभंकरोती म्हणायचे. 
नंतर रात्री मामींनी बनवलेल्या सुग्रास जेवणावर ताव मारून. अंगणात चांदण्याच्या आजीकडून गोष्टी ऐकण्यात वेगळीच मजा असायची. मात्र आता कहानी ऐकायलाच मिळत नाही. आजीची एक गोष्ट म्हणजे चार दिवस चालायची. कारण चांदण्यांकडे बघत झोप कधी लागायची, हेच कळायचे नाही. मामांचा गाव म्हणजे विचाराची खानच, त्यातच शब्दांच भांडार असलेल्या मामाच्या गावाला गेले की शब्दसंपत्ती वाढायची. तिथे आजी आजोबा कडून म्हणी, उखाणे, श्लोक, कथा शिकवले जायचे. मामा मामी पाड्याचे पाठांतर करून घ्यायचे. तसेच मित्र-मैत्रिणी गोळा करून गाण्याच्या भेंड्या खेळल्या जायच्या. तसेच आजीने भरवलेला प्रेमाचा घास आजच्या पिझ्झा, बर्गर पेक्षा कितीही गोड असल्याने त्या हाताची सर आज घडीला कोणालाही नक्कीच दिसत नाही .


कोरोना च्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांच्या मनातील मामा -मामी च्या गावाला कोरोणाचे ग्रहण लागल्याने सर्व खेळणे, बागडणे बंद झालेले दिसून येत आहे .हे जरी या सध्याच्या कोरोणामुळे व संचार बंदीमुळे असले तरी, ही उन्हाळ्यातील मामांचे गाव या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जीवनात दिवसेंदिवस कालबाह्य होताना दिसून येत आहे


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad