सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर (दादा) पाटील यांचे निधन 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर (दादा) पाटील यांचे निधन 


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर (दादा) पाटील यांचे निधन 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
तासगाव/प्रशांत केदार : सांगली जिल्हा मध्यवती सह. बँकेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व मांजर्डे (ता.तासगाव) गावचे सुपुत्र दिनकर पाटील (वय 63 वर्षे) यांचे रविवार दि. 3 मे रोजी पहाटे  दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मांजर्डे परिसरावर शोककळा पसरली होती. ते तासगाव पंचायत समितीच्या सभापती, जिल्हा बँकेच्या संचालिका कमलताई पाटील यांचे पती होते. अंत्यविधी साठी आमदार अनिल बाबर सह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.
दिनकर पाटील यांचेवर मागील  महिन्यापासून उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी त्यांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्यांना सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी त्यांचे निधन झाले.  माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून साथ देणारे, त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वत्र दादा या नावाने ओळखले जात. आमदार सुनमताई पाटील व आमदार अनिलभाऊ बाबर समर्थक म्हणून ते सर्वपरिचित होते. ते आबा कुटुंबाचे सेनापती  हंबीर मामा म्हणून प्ररिचित होते. 
 आपल्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मांजर्डे गावचा चेहरामोहरा बदलला होता. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती कमलताई पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचा सिहांचा वाटा होता. मांजर्डे गावचे माजी सरपंच, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले होते. कबड्डी व कुस्ती या खेळावर प्रेम करणाऱ्या दिनकर पाटील यांनी गावात राणाप्रताप व्यायाम संस्थेची स्थापना करून अनेक खेळाडू घडविण्यात मोलाचा वाटा उचलला.  स्व आर.आर.आबांच्या बरोबर काम करणारे दादा त्यांच्या कुटुंबियांशी एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीचे एक आक्रमक नेते म्हणून ते सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या पश्यात पत्नी, 3 भाऊ, बहीण व परिवार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments