आटपाडीत शहरात जनता कर्फ्यूला सकाळच्या सत्रात १०० टक्के प्रतिसाद 


आटपाडीत शहरात जनता कर्फ्यूला सकाळच्या सत्रात १०० टक्के प्रतिसाद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत आठवड्यातील प्रत्येक रविवार, मंगळवार व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आटपाडीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने घेतला आहे. या जनता कर्फ्यू ला आज आठवड्यातील पहिल्या रविवारी नागरिकांनी सकाळच्या सत्रात १०० टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला गेला.


हे ही वाचा :-  माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून


शहरातील मेन बाजार पेठ, बस स्थानक परिसर, बाजार पटांगण, शेटफळे चौक, सांगोला चौक, सिद्धनाथ चित्र मंदिर चौक, श्रीमंत बाबासाहेब देशमुख कॉलेज परिसर, आण्णाभाऊ साठे चौक, पंचायत समिती येथील विक्रमसिंह नगर, आबानगर चौक, ग्रामीण रुग्णालय परिसर, साई मंदिर चौक या परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी जनता कर्फ्यू चे पालन करण्यात येत आहे. 
जनता कर्फ्यू असताना कोणीही आटपाडी शहरात विनाकारण फिरकू नये जे विनाकारण शहरात फिरताना आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

Previous Post Next Post