चिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..

चिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..


चिकमहूद येथील कलाशिक्षकाने कलेच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी..
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वैभव काटे : संपूर्ण जगात कोरोना या विषाणूना फैलाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे लोकांना घरी थांबा, सुरक्षित रहा, गो कोरोना गो, असा संदेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रकारचा प्रयत्न चिकमहुद ता. सांगोला येथील मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहूद या प्रशालेतील कलाशिक्षक शेषनाथ इंगोले यांनी केला आहे.
गावातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गावातच त्यांचे निवासस्थान आहे. आणि त्यांनी स्वतःच्या घरावर तूच आहेस, तुझ्या जीवनास जबाबदार, घरातच थांबा. सुरक्षित रहा. असा संदेश पेंटिंग द्वारे दिला आहे. संचारबंदी च्या काळात आपल्या असणाऱ्या कलेचा सदुपयोग करून लोकांना जागृत करण्याचे कार्य केले आहे. रहदारीच्या ठिकाणी जाणारे येणारे नागरिक अशा प्रकारचा संदेश वाचून त्यांच्यावर प्रभाव पडत असून कोरोना चे गांभीर्य त्यांच्या लक्षात येण्यास मदत होत आहे. असे मत इंगोले यांनी व्यक्त केले. त्यांनी केलेल्या सामाजिक संदेशाचे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments