वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा सांगली रिपब्लिकन स्टुडंट फोरम कडून निषेध 

वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा सांगली रिपब्लिकन स्टुडंट फोरम कडून निषेध 


वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा सांगली रिपब्लिकन स्टुडंट फोरम कडून निषेध 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : नागपूर येथील उच्च शिक्षित, सामाजिक व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड रा.पिंपळधरा तालुका नरखेड या होतकरू युवकाचा खून करण्यात आला. पोलीस प्रशासनकडून या हत्येचा योग्य तपास न करता मृत्युस स्व:हत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेचा तीव्र निषेध रिपब्लिकन स्टुडंट फोरमचे अध्यक्ष अमोल वेटम, स्वप्नील खांडेकर, आदींनी केला आहे. दोषींवर व कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
निवेदन म्हटले आहे की,  गॅस एजन्सीचा संपर्क क्रमांक मिळावा यासाठी एका गॅस एजन्सीचा नंबर असलेल्या फलकाचा फोटो का काढला? असे म्हणून अरविंद बनसोड या युवकाला गुंडांकरवी जातीयदेव्शापोटी मारण्यात आले. यावेळी त्याला मानसिक, शाररीक त्रास देऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. हे सर्व गॅस एजन्सीचा मालक मिथलेश उमरकर यांच्या समक्ष घडले आहे.  गॅस एजन्सीच्या पायरी वर कीटनाशक औषधा जवळ अरविंदचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. या प्रकरणाचा किरकोळ गुन्हा नोंद केला गेला.  सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा, पोलीस राजकीय दबावाखाली असल्याने सदर तपास सी.आय.डी मार्फत व्हावा, अरविंदच्या कुटुंबास तत्काळ पोलीस संरक्षण व शासकीय मदत करावी. राज्याचे गृहमंत्री यांचा निकटवर्ती असल्याने आरोपी मिथलेश उमरकर व इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे साक्षीदार, अरविंदचे कुटुंब व सहकारी मित्रांकडून सांगण्यात आले आहे. 


Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments