आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल 


आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल 
बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्याबाबत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवार (दि. 24) पंढरपूर येथे बोलताना शरद पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आज (गुरुवार) याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात कलम 505 (2) नुसार तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post