रेशनकार्ड नसणाऱ्यांना दाळ व तांदूळ मोफत वाटप


रेशनकार्ड नसणाऱ्यांना दाळ व तांदूळ मोफत वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत अशा लोकांना हरभरा दाळ व तांदूळ यांचे मोफत वाटप ५८ स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी नूर कादरी यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यात एकूण १०६ स्वस्त धान्य दुकान असून त्यापैकी ५८ स्वस्त धान्य दुकानामधून ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशांना प्रति कार्ड एक किलो प्रमाणे दाळ व प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून माल उपलब्ध झाला आहे. हे वाटप मंगळवेढा शहरातील दामाजी हमाल मजूर सोसायटीमध्ये करण्यात येणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post