राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के : ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के : ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के : ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार  ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments