गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर


गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर
लखनऊ : कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये अखेर मारला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबे पोलिसांना गुंगारा देत होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला होता. अखेर काल त्याला मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. 
एसटीएफच्या गाडीमधून पोलीस विकास दुबेला कानपूरला नेत होते. त्यावेळी पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेने पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक सुरू झाली. त्यात विकाससह काही पोलीसदेखील जखमी झाले. त्यांना कानपूरमधल्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गाडीचा अपघात पाहून काही लोक घटनास्थळी पोहोचले. मात्र गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानं ते तिथून निघून गेले. एन्काऊंटर आणि अपघातात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलीस विकासचा दुबेचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली. एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


Post a Comment

Previous Post Next Post