केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन


केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली असून नवीन व्यवस्थेनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्रपाळी भत्ता अर्थात नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. 
आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशेष ग्रेड पेच्या आधारे नाईट अलाऊंस मिळत होता. परंतु आता नवीन व्यवस्थेनुसार, नाईट अलाऊंसमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून वेतनाही वाढ होईल.
नाईट ड्यूटीवेळी प्रत्येक तासासाठी 10 मिनिटांचं वेटेज देण्यात येईल. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केलेलं काम हेच नाईट ड्यूटी म्हणून मानलं जाईल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. नाईट ड्यूटी अलाऊंससाठी बेसिक पे सीलिंग अर्थात मूलभूत वेतन मर्यादा 43,600 रुपये प्रति महिना या आधारावर निश्चित केली गेली आहे.
हा नाईट अलाऊंसचा दर तासाच्या आधारे दिला जाईल, जो 200 ने विभाजित केलेल्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या बरोबरीचा असेल. सातव्या वेतन आयोगाच्या आधारे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता ठरवला जाईल. हाच फॉर्म्यूला सर्व मंत्रालयं आणि विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होईल.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad