मास्क, रूमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक अन्यथा 500 रूपये दंड : जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याने कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रूमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असलेबाबतच्या दि. 13 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.

 हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a comment

0 Comments