मोहोळमध्ये लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागितली होती सहा हजाराची लाच

मोहोळमध्ये लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागितली होती सहा हजाराची लाच


मोहोळमध्ये लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागितली होती सहा हजाराची लाच
प्रतिनिधी/मोहोळगुन्ह्या: अटक न करण्यासाठी सहा हजाराची
लाच मागितल्या प्रकरणी पोलीस नाईका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सयाजीराव लक्ष्मण होवाळ (वय ५२ वर्षे, पद- पोलीस नाईक, मोहोळ पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामिण. रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.


 याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी १६ मार्च रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ, पत्नी,दोन मुले यांचेविरुध्द मोहोळ पो. ठाणे गुरनं १४२/२०२० भादंवि कलम ३२४, १४३ वगैरे अन्वये गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा पो. ना. होवाळ यांचेकडे तपासासाठी आहे. दाखल गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नी व दोन मुलास अटक न करण्यासाठी त्यांना नोटीस देवून सोडून देण्यासाठी तसेच सदर गुन्हयात मदत व पुढे सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक होवाळ यांनी तक्रारदार गवळी यांचेकडे ६ हजार रूपये लाचेची मागणी केली.


 याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. त्यावरुन अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर कडुन तक्रारदार यांचे तक्रारीची खात्री करण्यात आली. त्यात होवाळ यांनी ६ हजारांची मागणी करुन तडजोडीअंती २ जुलै रोजी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी होवाळ यांचेविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ सोलनकर, म.पो.ना. स्वामी, पो. ना. पकले, पो. कॉ. पवार, पो. कॉ. सन्नके पथक लाचलुचपत प्रतिबंधक खाते सोलापूर यांनी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments