घराच्या उंचीपेक्षा गटारीची उंची जादा ; संबंधित ठेकदार व ग्रामपंचायतवर कारवाईची युवा नेते रोहित देशमुख यांची मागणी 

घराच्या उंचीपेक्षा गटारीची उंची जादा ; संबंधित ठेकदार व ग्रामपंचायतवर कारवाईची युवा नेते रोहित देशमुख यांची मागणी 


घराच्या उंचीपेक्षा गटारीची उंची जादा ; संबंधित ठेकदार व ग्रामपंचायतवर कारवाईची युवा नेते रोहित देशमुख यांची मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : येथील धोंडीसाहेब देशमुख नगर येथील रस्ता व गटारीच्या अनैसर्गिक उंचीला संबंधित ठेकेदार व त्याबरोबर ग्रामपंचायत  जबाबदार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित देशमुख यांनी केली आहे.
दिघंची येथे सध्या पंढरपूर ते मायणी मार्ग क्रमांक 76 चे काम सुरू आहे. मात्र दिघंची येथील धोंडीसाहेब देशमुख नगर  येथील रस्त्याची एक बाजू व त्याला लागूनच असणारी गटार याची उंची पाच ते सहा फूट झाली आहे. वास्तविक पाहता या रस्त्याच्या बाजूला अनेक गोरगरीब लोकांची घरे आहेत ही उंची अवास्तव वाढल्याने या लोकांना रस्त्या वर ये-जा करणे तसेच पावसाचे पाणी त्यांच्या घरात घुसणार आहे. त्यामुळे येथील रस्त्यालगत असणार्याे रहिवाशांचा  राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे काम सुरू असताना ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र ठेकेदार व ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याने त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे व यामुळे येथील रहिवाशांवर  ही वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारा बरोबरच ग्रामपंचायतीचे सरपंच ही यास जबाबदार आहेत. त्यामुळे या दोघांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित देशमुख यांनी निवेदनाद्वारे  संबंधित खात्याकडे केली आहे. तसेच दिघंची येथे अनेक ठिकाणी वादग्रस्त गटारीचे काम सरपंच  स्वतः उभा राहून करून घेत आहेत, मात्र इतका मोठा प्रश्न गंभीर होत असताना सरपंच का गप्प बसले? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments