आटपाडी तालुक्यात कोरोनाचा विस्फोट ; आज १८ लोकांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी तालुक्यात कोरोनाचा विस्फोट ; आज १८ लोकांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह


आटपाडी तालुक्यात कोरोनाचा विस्फोट ; आज १८ लोकांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला असून एकूण १८ लोकांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 
यामध्ये दिघंची १, पात्रेवाडी १, तडवळे ६, मापटेमळा १, व आटपाडी ९ अशी एकूण १८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
दिघंची येथील पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. पात्रेवाडी येथील आज आलेला पॉझिटिव्ह हा संपर्कातील आहे. तडवळे येथील आज आलेले ६ जण हे काल  आलेल्या महिलेच्या संपर्कातील आहेत. आटपाडी येथील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे सवर्जण तडवळे येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील आहेत. तर आटपाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील एका डॉक्टराचा समावेश आहे.मापटेमळा येथील आलेला पॉझिटिव्ह हा मुंबईहून आलेला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments