आटपाडी लॉकडाऊन  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आटपाडी तीन दिवस बंदचा निर्यण 

आटपाडी लॉकडाऊन  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आटपाडी तीन दिवस बंदचा निर्यण 


आटपाडी लॉकडाऊन 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आटपाडी तीन दिवस बंदचा निर्यण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी तालुक्यात कोरोना ने जोरदार एंट्री केली असून गुरुवारी शहरासह तालुक्यात एकूण 8 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यात आज अखेर कोरोना बाधित आकडा 93 वर पोचला आहे. वाणी गल्ली येथील एकाच घरातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसात वाढलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा तसेच शेजारील सोलापूर व सातारा जिल्ह्यात जाहीर केलेला लॉकडाऊन याचा विचार करून कोरोना ची साखळी तोडण्यासाठी आपत्कालीन ग्राम समितीने आयोजित केलेल्या बैठकीत सरपंच वृषाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता सलग तीन दिवस बंद राहणार असून सोमवारपासून सकाळी नऊ ते पाच या वेळेत व्यवहार सुरू राहणार असल्याचा निर्यण सर्वानुमते घेण्यात आला. तसेच मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांची संख्या जास्त झाल्याने फिरून विक्री करावे अशा सूचना शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक यांनी केल्या. 


 तर वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम यांनी होम क्वारंनटाईन हा पर्याय नसून त्याला अक्षेप असल्याचे त्यांनी मत व्यक्त करून नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन केले. तसेच बैठकीत जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 


 ग्रामीण भागात लॉकडाऊन वगळण्यात आले असला तरी कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जनतेने तीन दिवस बंद पाळून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले. यावेळी माजी सभापती व पं.स. सदय हर्षवर्धन देशमुख, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर, भारत (तात्या) पाटील, तानाजी पाटील, राजेंद्र खरात, माजी सरपंच  शिवाजी (तात्या) पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, डी.एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार देशमुख, भाऊ सागर, सुहास दौंडे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी सदस्य उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments