राजस्थानमध्ये भाजप झाली सक्रिय तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची फिल्डींग

राजस्थानमध्ये भाजप झाली सक्रिय तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची फिल्डींग


राजस्थानमध्ये भाजप झाली सक्रिय तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची फिल्डींग 
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हटवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले. पण, काँग्रेसने मनधरणी करुनही पायलट माघारी परतले नाही. अखेर त्यांच्यावर कारवाई करत उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर भाजप आता सक्रीय झाली आहे.
सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही.सतीश, गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर हजर होते.
तर दुसरीकडे अशोक गहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी 105 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच पायलट यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची घेतली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments