जत तालुक्याच्या माजी आमदारांचे निधन 

जत तालुक्याच्या माजी आमदारांचे निधन 


जत तालुक्याच्या माजी आमदारांचे निधन 


माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जत तालुक्याचे माजी अपक्ष आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


 


१९९५ मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी ते केवळ २९ वर्षाचे होते. त्यांनी त्यावेळचे तत्कालीन काँग्रेसचे दिग्गज नेते व दोनवेळा आमदार राहिलेले उमाजी सनमडीकर यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. १९९५ मध्ये त्यांनी युती सरकारला पाठींबा देत त्यांच्या आमदारकीच्या काळातच म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कामाची सुरुवात झाली होती.


 


त्यांच्या आमदारकीच्या काळात जत तालुक्यातील सिंचन व्यवस्था मजबूत बनली होती. तालुक्याला वरदान ठरणाऱ्या संख मध्यम प्रकल्पासह त्यांनी ७ मोठ्या तलावांची मोठी निर्मिती केली होती. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत सामान्य जीवन जगत होते. कर्नाटकातील अथणी तालुक्यात ते सध्या मुकाकामी होते.


Join Free WhatasApp


Post a comment

0 Comments