संपादकीय : कोरोनाच्या बाबतीत राजकारण कराल तर ‘कोरोना’ सगळ्यांचा जीव घेईल....


संपादकीय : कोरोनाच्या बाबतीत राजकारण कराल तर ‘कोरोना’ सगळ्यांचा जीव घेईल....
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू करण्याची आवश्यकता आहे का? असेल तर कधीपासून सुरू करायचा? यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक  जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन आमदारांना या बैठकीला जाणीवपूर्वक बोलावण्यात आलेलं नाही त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या वरती कडाडून हल्ला केला. 'कोरोनाच्या संदर्भात लाकडाऊन घोषित करणे आवश्यक आहे, किंवा नाही? या संदर्भात झालेल्या बैठकीस जाणीवपूर्वक आम्हाला बोलावण्यात आलेलं नाही, जयंतराव पाटील यांनी कोरोनाच्या बाबतीत राजकारण करू नये. पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले की," तुम्ही 1 लाख मते घेऊन निवडून आमदार झाला असला, तरी तुमच्यासारख्या 30 आमदारांनी म्हणजे 30 लाख मतदारांनी मला विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, याचं थोडं भान ठेवा.
पूरग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे झालेल्या बैठकीत नदीकाठच्या गावांना तातडीने बोटी उपलब्ध करून देण्याच्या या विषयावरून पालकमंत्री जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात खडाजंगी झालेली होती. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भातील बैठकीस जाणीवपूर्वक जयंतराव पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना बोलावण्याचे टाळले आहे तसेच जयंतराव पाटलांच्या गावचेच दुसरे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हेही जयंतरावांचे कट्टर विरोधक असल्यामुळे त्यांनाही या बैठकीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही, खरेतर जयंतराव पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी मालक मंत्री असल्यासारखा आव आणून व सांगली जिल्हा म्हणजे त्यांचं वतन आहे असा गैरसमज करून घेऊ नये. लॉकडाऊन सद्यस्थिती अतिशय गंभीर आहे. कारण प्रत्येक दिवशी शहरी भागाचा असेल किंवा ग्रामीण भागाचा असे कोरोनाग्रस्त नागरिकांचा वाढता आलेख गतीने पुढे जात आहे. याला नियंत्रित करायचं असेल तर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसेच आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा आणि समाज व्यवस्था या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून या संकटापासून सांगली जिल्ह्याला वाचवायचं प्रयत्न करायचं करणे अपेक्षित असतानाही जयंतरावांसारखे जाणकार पालक मंत्री जाणीवपूर्वक त्यांना अनुकूल असणाऱ्या आमदार आणि खासदारांना या बैठकीला निमंत्रित करतात व जे आमदार वास्तवाचं भान ठेवून व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अयोग्य निर्णयाला विरोध करून योग्य निर्णय घेण्याचा आग्रह करतात. त्यांना जयंत पाटील मीटिंगसाठी बोलवतच नाहीत हा जयंतराव पाटलांचा आततायीपणा किंवा बालिशपनाच आहे, असे म्हणावे लागेल. वरचेवर सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतच जात आहे. तसेच सरकारच्या वतीने व आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला केलेल्या आवाह्नानांचे जास्तीत-जास्त काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. यासाठी अगदी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार सर्वांना या कामासाठी सोबत घेऊन गेलो, तरच, आपण कोरोना सारख्या भयानक महामारीच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या महाराष्ट्राला व सांगली जिल्ह्यात आपण सही सलामत बाहेर काढू शकतो. जर अशा गंभीर परिस्थितीमध्ये कोरोना सारख्या संकटाशी सामना करत असताना जर मध्येच राजकारण आणले व सूडाच्या भावनेने या कार्यातून काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले, तर महाराष्ट्राला व सांगली जिल्ह्याला कोरोना पासून वाचणे अशक्य आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी पुढच्या काळात वरील सर्व पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य व प्रमुख यांना ही या कामाची जबाबदारी दिली पाहिजे. या सर्वांनी आरोग्य विभाग व सर्व डॉक्टर, नर्स व लॅब टेक्नीशियन,  पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि सामान्य जनता या सर्वांनी मिळून करोनाच्या विरोधात लढण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, तरच कोरोना आपल्या महाराष्ट्र राज्यातून पलायन करेल. जर कोरोनाशी लढत-लढत जर आपण राजकारण करून आपसात लढत बसलो. तर मात्र कोरोना आपल्या सर्वांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे किमान यापुढच्या कोरोना संदर्भातील व जनतेच्या अडीअडचणी संदर्भातील प्रत्येक मिटींगला सर्व महत्वपूर्ण घटकांना आवर्जून निमंत्रित करणे गरजेचे आहे. किमान यापुढे तरी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून सर्वांना यामध्ये सहभागी करून घेणे अपेक्षित आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad