कडेगाव व पलूस तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


कडेगाव व पलूस तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : पलूस तालुक्यात मौजे पलूस, मौजे रामानंदनगर, मौजे नागठाणे गावात तसेच कडेगाव तालुक्यात मौजे नेवरी (मळा) व मौजे सोनसळ गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पलूस हद्द येथील - 1) पूर्व - संगीता पाटोळे घर ते पंतसर यांचे घर 2) उत्तर - पंतसर यांचे घर ते एस. एन. कुलकर्णी यांचे घर 3) पश्चिम - एस.एन. कुलकर्णी यांचे घर ते मलपे घर 4) दक्षिण - मलपे घर ते संगीता पाटोळे घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन रामानंदनगर हद्द येथील - 1) पूर्व - राजाराम हणमंत जाधव घर ते मंगल नामदेव तिवारी घर 2) उत्तर - मंगल नामदेव तिवारी घर ते कुरेश युसुफ मुजावर यांचे घर 3) पश्चिम - कुरेश युसुफ मुजावर घर ते दिपक भालचंद्र मोहिते यांचे घर 4) दक्षिण - दिपक भालचंद्र मोहिते घर ते राजाराम हणमंत जाधव घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन नागठाणे हद्द येथील - 1) पूर्व - जयकर सदाशिव पाटील घर ते लक्ष्मण बाळकृष्ण पाटील यांचे घर 2) उत्तर - लक्ष्मण बाळकृष्ण पाटील यांचे घर ते मुरलीधर पाटील यांचे घर 3) पश्चिम - मुरलीधर बाळकृष्ण पाटील घर ते मारूती धोंडी यादव यांचे घर 4) दक्षिण - मारूती धोंडू यादव यांचे घर ते जयकर सदाशिव पाटील घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन नेवरी (मळा) हद्द येथील - 1) पूर्व - ग. नं. 1668 पासून पश्चिमेस मराठी शाळेपर्यंत 2) उत्तर - महादेव महाडिक घरापासून दक्षिणेस बबन शिंदे यांच्या घरापर्यंत 3) पश्चिम - मराठी शाळेपासून पूर्वेस ग.नं. 1668 पर्यंत 4) दक्षिण - बबन शिंदे यांच्या घरापासून उत्तरेस महादेव महाडिक घरापर्यंत. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन सोनसळ हद्द येथील - 1) पूर्व - युवराज माणिक कदम यांची ग.नं. 823 ची जमीन 2) उत्तर - मारूती बाबुराव कदम यांची ग.नं. 813 ची जमीन 3) पश्चिम - महादेव धोंडीराम देशमुख यांची ग.नं. 456 ची जमीन 4) दक्षिण - दिलीप यशवंत कदम यांची गट नं. 443 ची जमीन. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पलूस - 1) पूर्व - मातंग वसाहत रस्ता नामदेव पाटील यांचे घर ते जुना बांबवडे रस्ता श्री. गायकवाड वकील यांचे घर 2) उत्तर - जुना बांबवडे रस्ता श्री. गायकवाड वकील यांचे घर ते कुंडल वेस नगरपंचायत गाळे 3) पश्चिम - कुंडल वेस नगरपंचायत गाळे ते आमणापूर रस्ता अभिजित गायकवाड घर 4) दक्षिण - आमणापूर रस्ता अभिजित गायकवाड घर ते मातंग वसाहत रस्ता नामदेव पाटील घर.
बफर झोन रामानंदनगर - 1) पूर्व - ग.नं. 204 सुखदेव जोतीराम जाधव यांचे क्षेत्र ते जि.प. शाळा नं. 1 2) उत्तर - जि.प. शाळा नं. 1 ते ग.नं. 565 विकास बाजीराव पवार यांचे क्षेत्र 3) पश्चिम - ग.नं. 565 विकास बाजीराव पवार यांचे क्षेत्र ते ग.नं. 596 रामचंद्र गणपती हिंगमिरे यांचे क्षेत्र 4) दक्षिण - ग.नं. 596 रामचंद्र गणपती हिंगमिरे यांचे क्षेत्र ते ग.नं. 204 सुखदेव जोतिराम जाधव यांचे क्षेत्र.
बफर झोन नागठाणे - 1) पूर्व - नामदेव आप्पा चव्हाण घर ते ग.नं. 34 विकास राजाराम पाटील यांचे घर 2) उत्तर - ग.नं. 34 विकास राजाराम पाटील यांचे क्षेत्र ते ग.नं. 27 धनाजी शंकर शिंदे यांचे क्षेत्र 3) पश्चिम - ग.नं. 27 धनाजी शंकर शिंदे यांचे घर ते राजाराम तुकाराम शिंदे यांचे घर 4) दक्षिण - राजाराम तुकाराम शिंदे यांचे घर ते नामदेव आप्पा चव्हाण घर.
बफर झोन नेवरी (मळा) - 1) पूर्व - कनॉलपासून पश्चिमेस शिवगंगा कमानीपर्यंत 2) उत्तर - आंबेगाव नेवरी रस्त्यापासून तेल्याच्या ओढ्यापर्यंत 3) पश्चिम - शिवगंगा कमानीपासून पूर्वेस कनॉल पर्यंत 4) दक्षिण ज्ञ् तेल्याच्या ओढ्यापासून ते नेवरी आंबेगाव रस्त्यापर्यंत.
बफर झोन सोनसळ - 1) पूर्व - प्रकाश महादेव कदम यांची ग.नं. 830 ची जमीन 2) उत्तर - सर्जेराव श्रीपती कदम यांची ग.नं. 811 ची जमीन 3) पश्चिम - भीमराव चीलू देशमुख यांची गट क्र. 462 ची जमीन 4) दक्षिण - रघुनाथ श्रीपती कदम यांची ग.नं. 436 ची जमीन.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी दिले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad