शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या


शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु.येथील शिक्षक रमेश मधुकर कांबळे (वय 32) याने अज्ञात कारणावरून घरातील लोखंडी हलकडीला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद पोलिसात आकस्मात मयत अशी झाली आहे.
रमेश मधुकर कांबळे याने दि. ९ रोजी सायंकाळी ५.३० च्या पुर्वी रहाते घरातील लाकडाच्या लोखंडी हलकडीला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत पोलिसात त्याचा चुलत भाऊ अमोल सिध्दनाथ कांबळे याने फिर्याद दिली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post