गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे

गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे

  


गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सध्या जगावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच गणेशोत्सव तसेच मोहरम हे सण आलेले आहेत. त्यामुळे सदरचे सन तालुकावासियांनी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी केले आहे.


 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात फैलावू नये या करीता केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळावेळी लॉकडाऊन घोषीत केलेले आहेत. त्यामध्ये शासनाने संचार बंदी आदेश लागू केला असून सदर आदेशाची अंमलबजावणी सुरु असून प्रत्येक भारतीय नागरीकांने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाने प्रत्येक गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी नागरीकांना एकत्र न येण्याबाबत वारंवार मार्गदर्शनपर सुचना केलेल्या आहेत. काही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. जेणे करुन कोरोना विषाणु संसर्ग फैलाऊ नये. 
आटपाडी तालुक्यातील गणेश मंडळांच्या करगणी, खरसुंडी, दिघंची तसेच आटपाडी या ठिकाणी बैठका झाल्या असून मंडळांनी कोरोना विषाणुच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. तर काही मंडळांनी घरीच साधेपणाने कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले आहे. आटपाडी तालुक्यात कोरोना विषाणुचे अनुशंगाने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने गणेशोत्सवाचे अनुशंगाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन १) औटेवाडी २) कानकात्रेवाडी ३) भिंगेवाडी ४) वलवण ५) पात्रेवाडी ६) देशमुखवाडी ७) बोबेवाडी ८) तडवेळ ९) शेटफळे १०) मुढेवाडी ११) घरनिकी १२) राजेवाडी १३) कामत १४) आंबेवाडी १५) गोमेवाडी १६) खरसुंडी १७) चिंचाळे १८) धावडवाडी १९) घुलेवाडी या गावांमध्ये एक गावं एक गणपती बसवणार आहेत. तर बनपुरी व मिटकी या गावी यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नाहीत. 
कोरोना विषाणु संसर्ग फैलावु नये व त्यातुन कोणत्याही नागरीकाचा जीव जाऊ नये या करीता येणारे गणेशोत्सव तसेच मोहरम हे सण सार्वजनिक साजरे न करता साधेपणाने आपआपले घरी साजरे करणेत यावेत तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतींना लेखी कळवित आहोत. तसेच ग्रा.पं स्तरावर गणेश मंडळे तसेच मोहरम साजरे करणारे अध्यक्ष व सदस्य यांच्या बैठका घेऊन त्यांना आपले आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फतीने योग्य ते मार्गदर्शन करून सन साधेपणानेच साजरे करावे असे पीआय बजरंग कांबळे म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a comment

0 Comments