Type Here to Get Search Results !

तहसीलदार बदलीचा निषेध पेढे वाटून....


 


तहसीलदार बदलीचा निषेध पेढे वाटून....
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : एखाद्याच्या बदलीचा निषेध कोणत्या प्रकारे केले जाईल हे सांगता येत नाही. असाच प्रकार आटपाडी येथे घडला असून आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे (Tehsildar of Atpadi Sachin Langute) यांची बदली झाल्याने या बदलीचा निषेध त्यांच्याच कार्यालयासमोर विविध संघटनांनी पेढे वाटून केला.आटपाडी तालुका (Atpadi taluka) का कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक प्रकारचे प्रश्न असतानानाही या प्रश्नाकडे तहसीलदारांनी दुलर्क्ष केले. लोकांच्या विविध प्रश्नाबाबत त्यांच्या कार्यकाळात नाराजी दिसून आली. याबाबत आरपीआय, शिवसेना व विविध सामाजिक संघटनेच्या नागरिकांनी आज तहसील कार्यालयासमोर पेढे वाटून निषेध व्यक्त केला.  यावेळी बोलताना राजेंद्र खरात म्हणाले, आटपाडी तालुका सचिन लंगुटे तहसीलदार आल्यापासून तीन वर्ष मागे गेला आहे. (It has been three years since Atpadi taluka Sachin Langute became tehsildar) तीन वर्षामध्ये आटपाडी तालुक्याचे मोठे नुकसान केले आहे. वाळू तस्करीला त्यांनी प्राधान्य दिल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल त्यांनी बुडविला आहे. वाळू तस्करीचे पकडलेली वाहने बदलून मोठे आर्थिक व्यवहार करून नव्या वाहनाच्या ठिकाणी जुनी वाहने ठेवून ती बदलून दिली आहेत.७/१२ वरील साधे कुळ काढण्याच्या किरकोळ कामास दोन-तीन वर्ष लावली आहेत. गाडीला शासकीय ड्रायव्हर असताना त्याला वाळू तस्करीची माहिती होवू नये म्हणून मुद्दामहून खाजगी चालकांची नेमणूक करून त्याच्या मार्फत वाळू तस्कराकरून पैसे गोळा करण्याचे काम केले आहे.


 


अनेक विभागात त्यांची दलालांची साखळी निर्माण केली आहे. तर कोरोनाचा काळात ही त्यांनी दुर्लक्ष केल्याने तालुक्यात मोठी रुग्ण संख्या वाढल्याचे सांगत त्यांचा (Distributed benches in protest.) निषेध म्हणून पेढे वाटप केले. तर सादर घटनेबाबत तहसीलदार सचिन लंगुटे (Tehsildar of Atpadi Sachin Langute) यांची प्रतिक्रिया साठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, शिवसेनेचे सुभाष जगताप, भ्रष्टाचार निर्मुलनचे उत्तम बालटे, शशिकांत मोटे, नंदकुमार पवार, सुधीर देशमुख, सुभाष बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies