कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड 2020 सन्मानित

कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड 2020 सन्मानित


कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड 2020 सन्मानित


माणदेश टाइम्सकल्याण/प्रतिनिधी : नवनाथ रणखांबे  यांचे पहिलेच पुस्तक शारदा प्रकाशन ठाणे यांनी  प्रकाशित केलेल्या जीवन संघर्ष या पुस्तकावर कमीत कमी वेळेत विविध मान्यवरांनी लिहिलेली  ५१  परिक्षणे प्रकाशित झाली असून कवी नवनाथ रणखांबे यांची  इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यापूर्वी ऐतिहासिक नाव नोंदणी  झाली होती. जीवन संघर्ष या पुस्तकावर आतपर्यंत ६३ परीक्षणे विविध मान्यवरांनी लिहिलेली वर्तमानपत्र, दैनिक,  साप्ताहिक, मासिक,  इ. मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. जीवन संघर्ष पुस्तकाची  रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड 2020 मध्ये ऐतिहासिक नोंद झाली असून रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने  फाउंडर चीफ एडिटर क्रांती महाजन यांनी जाहीर केले असून रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने त्यांना नुकतेच  सन्मानित केले आहे.विविध पुरस्काराने  सन्मानित झालेल्या जीवन संघर्ष पुस्तकाला मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नेल्सन मंडेला  आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. आज रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐतिहासिक विक्रम होऊन नोंद  झाल्यामुळे  मला अतिशय आनंद होत आहे.  जे पाहिले, जे अनुभवले, जे  ऐकले ते ओढून ताणून न लिहिता जसे आहे तसे लिहिण्याचा जीवन संघर्ष या पुस्तकाचा प्रयत्न होता. जीवन संघर्ष हे पुस्तक वाचक आणि समीक्षक  यांना आवडले म्हणून त्याचे  स्वागत त्यांनी  भरभरून  केले. वाचक वर्ग व जाणकार समीक्षक यांनी जीवन संघर्ष पुस्तकाबद्दल  अभिनंदन, समीक्षा, अभिप्राय  आणि सूचना देऊन कौतुक केले आहे.  मला मार्गदर्शन करणाऱ्या,  जीवन संघर्ष  पुस्तकाला मदत करणाऱ्या,  ज्ञात आणि अज्ञातांचे मी सर्वांचे  आभार मानतो असे  यावेळी बोलताना नवनाथ रणखांबे यांनी  मत व्यक्त  केले. कवी नवनाथ रणखांबे हे कल्याण येथे राहत असून सामाजिक, शैक्षणिक, कला , सांस्कृतिक, साहित्य, कामगार संघटना इ. विविध क्षेत्रात सामाजिक संस्था आणि संघटनेत कार्यरत राहून उल्लेखनीय समाजकार्य आणि समाज प्रबोधन करीत आहेत. तर जीवन संघर्ष पुस्तक हे त्यांचे गाजत आहे.  त्यांना   आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने गौरवले आहे.


 
रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐतिहासिक नोंद झाल्याबद्दल  त्यांच्यावर  विविध ठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.


 


माणदेश टाइम्स whatasapp वर Free update मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments