कोविड रूग्णांवर औषधोपचार करण्यास टाळाटाळ ; 5 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल

कोविड रूग्णांवर औषधोपचार करण्यास टाळाटाळ ; 5 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल


कोविड रूग्णांवर औषधोपचार करण्यास टाळाटाळ ; 5 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखलसांगली, दि. 21: घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च  सेंटर, सांगली हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी (Municipal Commissioner Nitin Kapdanis) महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केल्यानुसार कार्यान्वित केले आहे. या हॉस्पीटलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांनी कोविड रूग्णांवरती औषधोपचार करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार (Municipal Health Officer Dr. Sunil Ambole) महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे.


 सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.


 


सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च  सेंटर, सांगली हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे. मनिषा आवळे, सुनिता माने (चेलेकर), कलावती बाबर, प्रज्ञा थोरवत, सोनाली करंडे यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments