Type Here to Get Search Results !

आटपाडी ग्रामपंचायत 53 लाख रुपये निधी विकासकामाचे उद्घाटन संपन्न 


आटपाडी ग्रामपंचायत 53 लाख रुपये निधी विकासकामाचे उद्घाटन संपन्न 


 


आटपाडी ग्रामपंचायत 14 वा वित्त  आयोग व दलितवस्ती रस्ते सुधार योजनेअंतर्गत 53 लाख रुपये निधीतून विविध ठिकाणी रस्ते  गटारी  व पेविंग ब्लॉक  बसवणे  अशा  विविध विकासकामांचे उद्घाटन आटपाडी तालुक्याचे नेते अध्यक्ष श्री. तानाजीराव पाटील व सांगली जिल्हा परिषदेचे  माजी  समाज कल्याण सभापती श्री. ब्रह्मानंद पडळकर तसेच आटपाडी ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.


 


यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. साहेबराव पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री. धनंजय पाटील, श्री. दत्तात्रय पंच पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश मरगळे, श्री. बाळासाहेब मेटकरी,  सौ. लक्ष्मी राजेंद्र बालटे, श्री. राजेंद्र बालटे,  ग्रामसेवक श्री. दत्तात्रेय गोसावी, श्री आबासाहेब उर्फ दादासाहेब पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री. यु टी जाधव सर, युवा सेना अध्यक्ष श्री. संतोष पुजारी, मधुकर बाळु माळी, श्री. अनिकेत अशोक माळी. श्री. राजाभाऊ राजमाने, श्री. पीनु (पंच) उर्फ आप्पासो माळी, श्री. मनोज नांगरे उर्फ कारभारी, श्री. संतोष उर्फ SP पाटील, मार्केट कमिटी सदस्य श्री. विष्णुपंत अर्जुन, श्री. अनिल सूर्यवंशी, अध्यक्ष श्री. प्रभाकर पुजारी, श्री. आप्पासाहेब पाटील, श्री प्रदीप आनंदा पाटील श्री प्रदीप उर्फ बाबू विश्वास पाटील, श्री. सचिन सपाटे, श्री. मच्छिंद्र पुजारी, श्री. कानिफनाथ खंडागळे, श्री. सुरज चव्हाण, श्री. मनोज देशपांडे, श्री सुखदेव पाटील व त्या त्या भागातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 


आज उद्घाटन करण्यात आलेल्या विकासकामां अंतर्गत आटपाडी ग्रामपंचायत मार्फत  शासनमान्य ठेकेदार यांच्याकडून पुढील कामे आजपासूनच  करण्यात येणार आहेत.


 


1) प्रकाशवाडी  बालाजी मंदिर  येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे  रक्कम रुपये 1 लाख


 2) साठे नगर जवळील  दत्तनगर  येथे कारखाना रोड ते गुळीक घर रस्ता डांबरीकरण व गटर करणे-निधी 10 लाख रुपये.


3)  साठे नगर जवळील  दत्तनगर  येथे गुळीक घर ते बालटे वस्ती  कारखाना रोड  सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - निधी 10 लाख रुपये.


4) सिद्धार्थनगर नूतन भंडारे  यांच्या घराकडे जाणारा  रस्ता तयार करून  पेविंग ब्लॉक बसविणे - निधी 3 लाख रुपये


5) सोमेश्वर नगर-  मंदिरासमोर  पेविंग ब्लॉक बसवणे - निधी 3 लाख रुपये.


6) म्हारनुर वस्ती जवळ श्री. विलास लांडगे यांच्या घराकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे - निधी 5 लाख रुपये .


7) शाहू कॉलनी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे - निधी 3 लाख रुपये.


8) निंबवडे रोड  ते  हॉटेल गार्डन मार्गै धांडोरमळा  कडे जाणारा रस्ता मुरमीकरण करणे - निधी 3 लाख रुपये.


9) विठ्ठल नगर येथे बायपास रस्ता ते धीरज प्रक्षाळे घर मार्गे नंदिवाली वसाहत रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे - निधी 15 लाख रुपये.


वरील नमूद ठिकाणी रस्त्याची व गटारी ची मागणी बऱ्याच वर्षापासून तेथील नागरिक करत होते. सदर विविध विकास कामांचे प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies