डीएसके गुंतवणूकदारांचे पैसे तत्काळ मिळावे : उच्च न्यायालयात याचिका दाखल

डीएसके गुंतवणूकदारांचे पैसे तत्काळ मिळावे : उच्च न्यायालयात याचिका दाखल


डीएसके गुंतवणूकदारांचे पैसे तत्काळ मिळावे : उच्च न्यायालयात याचिका दाखलमुंबई : डीएसकेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुतवणूकदारांनी त्यांनी गुतवणूक केलेले पैस परत मिळावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


 


पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके म्हणजे दिलीप कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांच्या तब्बल 1200 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात खटला दाखल करण्यात आलेला आहे, ज्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. मात्र, गुंतवणूकदारांच्या मेहनतीचा पैसा हा त्यांना तत्काळ मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी याचिका दाखल केली आहे.


 गुंतवणूक केलेल्या पैशावर अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन डीएसके यांनी तब्बल बाराशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच डीएसके यांना अटक केल्यानंतर सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. याबरोबरच डीएसके यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.


 मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू असून डीएसके यांचा ड्रीम सिटी प्रकल्प म्हाडाला देऊन त्यातून येणाऱ्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. डीएसके यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करणे अद्यापही शक्य झाले नसल्याचे याचिकेत मांडण्यात आलेले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments