आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण


आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्णमाणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरु असून आज तब्बल 29 नवे रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.आजच्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कोर्ट परीसरातील एकाच कुटुंबांतील ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धांडोरमळा येथे २ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मगरवस्ती व पोलीस स्टेशन १ व कारखानापाटी १ असे एकूण १२ रुग्ण शहरात आढळून आले आहेत. तालुक्यातील दिघंची येथे ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे येथे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. झरे येथे आज ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण २९ नव्या रूग्णामध्ये तालुक्याने ५०० रुग्णाचा आकडा पार केला असून तालुक्यात एकूण ५०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments