आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये केला बदल


 


आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये केला बदलमुंबई : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या चर्चेत आले असून त्यांना नवीन जबाबदार मिळणार का? असा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये केला आहे. त्यांनी ट्विटर प्रोफाइवरुन ‘महाराष्ट सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री’ हे शब्द काढून टाकले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे यावरुन चर्चा रंगली आहे.आदित्य ठाकरे यांनी अचानक ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल कऱण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना किंवा आदित्य ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.सुशांत सिंह प्रकरणी वारंवार आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे. विरोधक थेटपणे आदित्य ठाकरेंचं नाव घेणं टाळत असले तरी अप्रत्यक्षपणे वारंवार त्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.


 


सोबतच सुशांत सिंह प्रकरणी चौकशी सुरु असलेल्या रिया चक्रवर्तीनेही आपण आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर प्रोफाईलवर, युवा सेनाचे अध्यक्ष, मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबाल असोसिएशनचे अध्यक्ष असं लिहण्यात आलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured