गणेशोत्सवात वस्तीचे गणेश नगर नामकरण


 


गणेशोत्सवात वस्तीचे गणेश नगर नामकरण
माणदेश एक्सप्रेस न्युजमाळशिरस/लक्ष्मण काळेल : यंदा कोरोना महामारी मुळे गणेशोत्सव सर्वत्र साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. मात्र गणेशावरील निश्चित भक्ती, श्रद्धा, प्रेरणा आजही भाविकांमध्ये कायम दिसते. भांबुर्डी (ता.माळशिरस) येथील गावच्या हद्दीत स्थापन झालेल्या वस्तीला नागरिकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश नगर असे नामकरण केले. या फलकाचे अनावरण माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले.भांबुर्डी गावातील बहुसंख्य  लोकसंख्या वाड्या-वस्त्यांवर विखुरलेल्या स्थितीत आहे त्यामुळे गावाच्या हद्दीतील गेल्या काही वर्षांपासून नव्याने लोकवस्ती तयार झाली होती. यामध्ये शेती महामंडळ, अथवा आसपास शेती असलेल्या अनेक नागरिकांनी वस्ती तयार केली होती.


  


मात्र या वस्तीला नामकरण नसल्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवात गणेश भक्तीचे प्रतीक म्हणून या वस्तीचे गणेशनगर असे नामकरण केले. यावेळी माजी सरपंच  देविदास वाघमोडे, पोपट वाघमोडे,  माजी सरपंच  शहाजी बनसोडे, संतोष कुदळे  वस्तीवरील ग्रामस्थ मंडळी उपस्थितीत होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured