नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह


नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्हनागपूर : नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली.माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपल्याला जिंकायचं आहे,  असे ट्वीट तुकाराम मुंढे यांनी केले आहे


 


.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

Previous Post Next Post