Type Here to Get Search Results !

पीयूसी काढा नाहीतर वाहन नोंदणी होईल रद्द ; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय


पीयूसी काढा नाहीतर वाहन नोंदणी होईल रद्द ; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय


 


मुंबई : आपल्याकडे असणाऱ्या चार चाकी वाहनांची पीयूसी काढा नाहीतर वाहन नोंदणी रद्द करा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 


 


पेट्रोल-डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विद्युत वाहनांसह सीएनजी, एलपीजी गाड्यांवर भर देत आहेत. वैध पीयूसी नसल्यास वाहननोंदणी रद्द करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे.


 


वैध पीयूसी नसलेल्या वाहनांबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. यानुसार महाराष्ट्रातदेखील अंमलबजावणी होणार असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.


 


 


लॉकडाउनमध्ये मुंबईसह अनेक शहरांतील हवेची योग्यता पातळी सुधारली होती. अनलॉक काळात सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. यामुळे खासगी वाहतुकीचा वापर वाढत आहे. 


 


त्यातच अनेकजण कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने खासगी वाहनांला पसंती देत आहेत. याकाळात पीयूसीसह अन्य कागपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन आयुक्तालयातील अधिकारी सांगतात.


 


पीयूसी नसलेल्या वाहनांमुळे कार्बनचे उत्सर्जन अधिक होते. यामुळे हवेची योग्यतापातळी खालावते. त्याचबरोबर अनेक नागरिकांना श्वसनाचाही त्रास उद्भवतो. अनेक वाहनधारकांकडून पीयूसीबाबत गांभीर्य नसल्याने राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने २०१५ मध्ये वैध पीयूसी नसलेल्या वाहनांना इंधन देऊ नये तसेच वाहननोंदणी निलंबित करण्याचे आदेश दिले होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies