Type Here to Get Search Results !

डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार अन मुख्यमंत्र्यापेक्षा संपादक हुशार: मनसेचा शिवसेनेला टोला


डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार अन मुख्यमंत्र्यापेक्षा संपादक हुशार: मनसेचा शिवसेनेला टोलामुंबई : डॉक्टरला काय कळत, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतात. मी कधीच डॉक्टरकडून गोळ्या घेत नाही. मी कंपाऊंडरकडून गोळ्या घेतो, असे वक्तव्य शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत देताना केलं होतं.


 


त्यावरून राऊत यांना सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशातच या प्रकरणात आता मनसेही उतरली असून मनसेही राऊतांवर जहरी टीका केली आहे.


‘डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा संपादक हुशार’, असा खरमरीत टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हाणला असून त्यांनी ट्विट करून खासदार संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला समाचार घेतला आहे.


 


अगोदरच ठाणे येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हद्दपार नोटीसी वरून राजकारण सुरु असून यामध्ये मनसेने शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात मनसे व सेना राजकीय कलगीतुरा रंगणार आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
 


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies