विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर बरे झाले असते : रोहित पवारांचा अशिष शेलार यांच्यावर पलटवार

विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर बरे झाले असते : रोहित पवारांचा अशिष शेलार यांच्यावर पलटवार


विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर बरे झाले असते : रोहित पवारांचा अशिष शेलार यांच्यावर पलटवारमाणदेश एक्सप्रेस न्युज टीमआटपाडी : आज सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील दहा लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो. पण ऐकत कोण? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिला. असे ट्विट करत करत महाविकासआघाडी वर जोरदार टीका केली होती.त्यांच्या या ट्विट ला रिट्विट करत राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखे राजकीय नाही, तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी होती व राहील. पण अशिष शेलार यांनी बबड्याची सिरीयल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती, तर तुम्हाला हे पटलं असतं आता. त्यासाठी किमान आपल्याला आलेले रिप्लाय तरी वाचले असते त्र ब्रे झाले असते असे ट्विट करीत त्यांच्यावर जोरदार टीका केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments